Pimpri corona Update : धक्कादायक रुग्णवाढ ! शहरात आज 2 हजार 499 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे कहर सुरु आहे. आज (शुक्रवारी) शहराच्या विविध भागातील 2463 आणि महापालिका हद्दीबाहेरील 36 अशा 2 हजार 499 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 384 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 361 नवीन रुग्ण सापडले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1507 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 16 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 19 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 17 पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 44 हजार 714 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 22 हजार 990 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2034 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 842 अशा 2876 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 3398 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1546 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 1 लाख 59 हजार 932 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 13 हजार 289 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.