Pimpri News: धक्कादायक, आज एकाचदिवशी कोरोनामुळे 41 जणांचा मृत्यू; 865 नवीन रुग्ण

141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. : Shockingly, 41 people died of corona in a single day today; 865 new patients

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुळे तब्बल 41 जणांचा आज (बुधवारी) मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शहराच्या विविध भागातील 853 आणि पालिका हद्दीबाहेरील 12 अशा 865 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 37 हजार 716 झाली आहे.

तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज शहरातील 34 आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये कृष्णानगर (पुरुष 55 वर्ष ), थेरगांव (स्त्री 66 वर्ष ), गांधीनगर (स्त्री 58 वर्ष ), पिंपरी (स्त्री 31 वर्ष , पुरुष 57 वर्ष , स्त्री 64 वर्ष ), चिंचवड (स्त्री 49 वर्ष ,पुरुष 74 वर्ष ), तळवडे (पुरुष 75 वर्ष ), बिजलीनगर (पुरुष 68 वर्ष ), काळेवाडी (पुरुष 82वर्ष , पुरुष 45 वर्ष , स्त्री 70 वर्ष ), निगडी(स्त्री 40 वर्ष , पुरुष 59 वर्ष ), भोसरी (स्त्री 70 वर्ष ), रुपीनगर (पुरुष 65वर्ष , पुरुष 45वर्ष ), सांगवी (पुरुष 66वर्ष ), दिघी (पुरुष 77 वर्ष ), पिंपळेगुरव (स्त्री 49 वर्ष ), कासारवाडी (स्त्री 57 वर्ष ), चिखली (पुरुष 60 वर्ष ), रहाटणी (पुरुष 80 वर्ष ,पुरुष 65 वर्ष ), फुगेवाडी (पुरुष 80वर्ष ), चाकण (पुरुष 66 वर्ष , स्त्री 56 वर्ष , पुरुष 70 वर्ष ), आंबेठाण (स्त्री 54 वर्ष ), शिरुर (पुरुष 72 वर्ष ), खेड (पुरुष 88वर्ष ), हिंजवडी (पुरुष 37वर्ष ), येथील रहिवासी आहेत.

शहरात आजपर्यंत 37 हजार 716 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 25 हजार 399 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 719 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 141 अशा 860 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6137 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.