Pimpri News: पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद, केवळ 21 टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील 5 वी ते 8 वीचे वर्ग आज (गुरुवार) पासून सुरू झाले. आज पहिल्यादिवशी खासगी, महापालिका अशा 1 लाख 19 हजार 200 विद्यार्थ्यांपैकी अवघे 25 हजार 745 म्हणजे 21 विद्यार्थी उपस्थित होते. पहिल्यादिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते.

महापालिकेच्या 120 शाळांमध्ये 19 हजार 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी आज पहिल्या दिवशी 5 हजार 343 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 1 हजार शिक्षक उपस्थित होते. शहरामध्ये 5 वी ते 8 वीच्या 314 खासगी शाळा आहेत. त्यापैकी 304 शाळा आज सुरू झाल्या. उर्वरित 10 शाळांनी अद्याप कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तयारी केली नसल्याने पहिल्या दिवशी या शाळा सुरू झाल्या नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

खासगी 314 शाळांमध्ये 99 हजार 550 इतकी पटसंख्या आहे. त्यापैकी अवघे 20 हजार 402 विद्यार्थी उपस्थित होते. महापालिका आणि खासगी शाळा मिळून 1 लाख 19 हजार 200 विद्यार्थ्यांपैकी अवघे 25 हजार 725 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहे. सुरक्षित अंतराचे पालन केले जात आहे.

याबाबत बोलताना माध्यमिक विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे म्हणाले, ”खासगी व महापालिकेच्या शाळांमध्ये 25 हजार 745 म्हणजेच 21 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. हळूहळू विद्यार्थ्यांच्या प्रतिसाद वाढत जाईल. पालकांच्या मनातील भीती थोडीसी कमी होणे आवश्‍यक आहे. शाळांमध्ये सुरक्षित व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना शिकविले जाणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.