Pimpri News: ‘कोविशिल्ड’ची टंचाई! गुरुवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला सलग तिस-यादिवशी ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (गुरुवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

18 ते 44, 45 वर्षांपुढील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार लस
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर,  साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर, जुने तालेरा रुग्णालय, महापालिका शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, सेक्टर नंबर 29, आठवडा बाजार शेजारी रावेत, प्रेमलोक पार्क दवाखाना, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी,

मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, क्वालिटी सर्कल भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर,  खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळे निलख इंगोले शाळा, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका बोपखेल शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सखुबाई गार्डन, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, गंगोत्री पार्क दिघी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी,

घरकुल दवाखाना चिखली, रुपीनगर ठाकरे शाळा, तळवडे समाज मंदिर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर,स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, नूतन शाळा ताम्हाणे वस्ती, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, भानसे स्कुल यमुनानगर, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह,

दिनदयाल शाळा पवना बँके मागे, संत तुकारामनगर, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी,  कासारवाडी दवाखाना,  निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव आणि बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 47 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येतील. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.