Pimpri News : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे श्रीकांत चौगुले यांना साहित्य विशारद पदवी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे श्रीकांत चौगुले यांना साहित्य विशारद ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते गुरूवारी (दि.28) चौगुले यांना पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह माधव राजगुरू, तसेच परिषदेचे पदाधिकारी व महाराष्ट्रातील कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

साहित्यप्रेमींमध्ये प्रतिष्ठेची असलेली साहित्य विशारद ही परीक्षा खंडित झाली होती. त्यानंतर अभ्यासक्रमाची पुनर्रचना करून ती नव्याने सुरू करण्यात आली. या परिक्षेत चौगुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

चौगुले हे लेखक, निवेदक म्हणून परिचित आहेत. त्यांना अनेक विषयांचा व्यासंग आहे. यापूर्वी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानची साहित्यभूषण ही परीक्षाही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने त्यांना इंद्रायणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय मनोबोध विशारद, ज्योतिष विशारद, वास्तुशास्त्र विशारद अशा नानाविध परीक्षांमध्ये त्यांनी यश मिळवले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.