Pimpri News: अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी सिंधी समाजातर्फे 210 शिला दान

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी पिंपरीतील सिंधी समाजातील विश्व सिंधी सेवा संगम आणि सुहिना सिंधी या दोन संस्थांनी भगवान झुलेलाल यांची मुद्रा असलेल्या 210 शिला मंदीराचे प्रतिनिधी संपत राय यांच्याकडे सुपूर्त केल्या आहेत.

विश्व सिंधी सेवा संगम या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक गोपाल साजनानी, अध्यक्ष राजु मनवानी, भरत वतवानी, सुहिना सिंधी संस्थेचे अध्यक्ष पितांबर ढालवानी, विश्व सिंधी सेवा संगम संस्थेच्या माजी महिला अध्यक्षा भारती छाबडिया, महिला अध्यक्षा लता अवतानी, पिंपरी शाखेचे अध्यक्ष मनोहर जेठवानी, दिपक लोहाना, मोती रामवानी, नंदू भोगले आदी यावेळी उपस्थित होते.

अयोध्येत राममंदिरचे बांधकाम चालू झाले आहे. या मंदिराच्या बांधकामात सिंधी समाजाचा खारीचा वाटा असावा म्हणून सिंधी समाजातील विश्व सिंधी सेवा संगम आणि सुहिना सिंधी या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन मंदिरासाठी सुमारे दोनशे शिला दान करण्याचा निर्णय घेतला. त्यास समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भगवान झुलेलाल यांची मुद्रा असलेल्या 210 शिला मंदीराचे प्रतिनिधी संपत राय यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. पिंपरीतील दानशूर गोपी आसवानी, धनराज मघंनानी आणि परमानंद जमतानी यांनी शिला दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.