Pimpri News: तब्बल नऊ महिन्यांनी स्मार्ट सिटीची बैठक, 788.53 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी

Pimpri News: Smart City meeting approves budget of Rs 788.53 crore after nine months कोरोनामुळे मार्चमध्ये स्मार्ट सिटीच्या अर्थसंकल्पास संचालक मंडळाची मंजुरी मिळाली नव्हती. श्रावण हर्डीकर यांच्या अधिकारात अर्थसंकल्पांची अंमलबजावणी सुरू झाली होती.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची दहावी बैठक तब्बल नऊ महिन्यांनी गुरुवारी (दि.13) झाली. त्यात 788.53 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देत स्मार्ट डिजिटल सेवा, इ क्लास रुम आणि लिनियर गार्डन विस्तारास मान्यता देण्यात आली.

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची शेवटची बैठक 30 डिसेंबरला झाली होती. त्यानंतर कोरोनामुळे नऊ महिन्यांनी बैठक झाली.

ऑटो क्लस्टर – चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीस महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, संचालक सचिन चिखले, प्रमोद कुटे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, मुख्य वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण, राजन पाटील, जनरल मॅनेजर अशोक भालकर आदी उपस्थित होते.

अध्यक्ष नितीन करीर, संचालक ममता बत्रा, विभागीय आयुक्त सौरभ राव हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस सहभागी झाले होते.

कोरोनामुळे मार्चमध्ये स्मार्ट सिटीच्या अर्थसंकल्पास संचालक मंडळाची मंजुरी मिळाली नव्हती. श्रावण हर्डीकर यांच्या अधिकारात अर्थसंकल्पांची अंमलबजावणी सुरू झाली होती. या बैठकीत सन 2019-20 च्या सुधारित अंदाजपत्रकाबाबत चर्चा झाली. अर्थसंकल्पात नवीन लेखाशीर्ष निर्मिती करणे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार दिले.

तसेच 788.53 कोटीच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली. स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे – गुरव येथील रस्ते, लिनियल गार्डन विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये इ- क्लास रुम प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी सल्लागार नियुक्तीस मंजुरी देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात दहा शाळांची निवड झाली आहे. पॅन सिटी प्रकल्पांतर्गत व्हेरिएबल मेसेज साइनबोर्ड, सिटी मोबाईल अ‍ॅप, स्मार्ट कियॉस्क आणि वाय – फाय सारख्या डिजिटल सेवा मोफत देण्यास नियुक्त करण्यास मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.