Pimpri News: स्मार्ट सिटीतर्फे पोलिसांना अत्याधुनिक सुविधायुक्त तीन मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी तर्फे पोलीस आयुक्तालयाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त तीन मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या गरजेनुसार या व्हॅन बनविण्यात आल्या असून बंदोबस्त, संप, आषाढीवारीसाठी या व्हॅनचा पोलिसांना उपयोग होणार आहे.

कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरीक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांच्याकडे या व्हॅनचे हस्तांतरण करण्यात आले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, उपमहापौर केशव घोळवे, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, संचालक सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, विजय बोरुडे उपस्थित होते.

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये या वाहनांचा उपयोग होईल. व्हॅन दिल्याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका पदाधिका-यांचे आभार मानले.

मोबाईल सर्व्हीलन्स व्हॅनची वैशिष्ट्ये

पीटीझेड कॅमेरा, व्हेईकल एचडी कॅमेरा, 8 पोर्टेबल वायरलेस कॅमेरा, 2 ऑपरेटर, व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर 12, एसी आणि जनरेटर सेट, एक आठवठ्याची व्हिडीओ साठविण्याची क्षमता, 1 लॅपटॉप, 55 इंची एलईडी टिव्ही, मिटिंग रुम, वाहनांसाठी एलईडी लाईटस्, चार स्पिकर व सायरन, दंगल प्रतिबंधक उपकरणे, युपीएस, स्ट्रेचर, फ्रस्टेड बॉक्स आणि फायर एक्स्टेंग्चर अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा असलेली व्हॅन पोलीस दलासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

पोलिसांना यासाठी होईल व्हॅनचा उपयोग

आषाढी व कार्तिकी वारी, आळंदी व देहू यात्रा, मोहरम, गणेशोत्सव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, संप, निवडणूक बंदोबस्त, सार्वजनिक सण, आपत्कालीन परिस्थिती, जमाव नियंत्रणासाठी उपयोग होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.