Pimpri News: …म्हणून मी कोरोनाच्या आढावा बैठकीला जात नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – सगळी अरेरावी चालली आहे. कोरोनाच्या आढावा बैठकांमध्ये सूचनांना वाटाण्याचा अक्षदा लावणार असाल. तर, त्या फॉर्म्युलीटी आम्हाला नकोत. त्यामुळेच गेल्या दीड वर्षांपासून मी कोरोना आढावा बैठकीला जात नाही नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आढावा घेतात. दर आठवड्याला ते पुण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतात. या बैठकीत विविध निर्णय घेतले जातात. पण, कोथरुडचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील मागील दीड वर्षांपासून या आढावा बैठकीला जात नाहीत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, सगळी अरेरावी चालली आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून मी बैठकीला जात नाही. मी पण महाराष्ट्राचा मंत्री होतो. तुमच्यासारखी माझी राजकीय परंपरा नसेल. माझे वडील कामगार होते. पण, कोण वेढे नव्हते, ना मला आठ खाती द्यायला, मी दोन नंबरचा मंत्री होतो. आढावा बैठकांमध्ये सूचनांना वाटाण्याचा अक्षदा लावणार असाल. तर, त्या फॉर्म्युलीटी आम्हाला नकोत.

पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत रद्द झाली पण सांगली जिल्ह्यात होत आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, बैलगाडा शर्यत बंद करणे योग्य नाही. नियम कडक करावेत. जनजीवन सुरु व्हायला पाहिजे. माणूस जिताजागता असतो. तो चावी लावल्याने बंद चालू होत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.