Pimpri News: …तर लवकरच कोरोनामुक्त होऊ; अजितदादांना विश्वास

क्वारंटाईन होताना पळवाट काढणे म्हणजे सर्वांच्या जीवाशी खेळण्यासारखे

एमपीसी न्यूज – राज्यात नव्या स्ट्रेनचे सात रुग्ण सापडले आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी क्वारंटाईन झाले पाहिजे. स्वत:ची, दुस-याची काळजी घेतली पाहिजे. क्वारंटाईन होताना पळवाट काढणे म्हणजे सर्वांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली तर आपण लवकरच कोरोनामुक्त होऊ, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल फोर्स, पोलिसांना पहिल्यांदा लस दिली जाणार आहे.

जे इतरांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करतात. त्यांना पहिल्यांदा लस दिली पाहिजे. त्यांना सर्वांना लस मिळाल्यानंतर इतरांचा विचार केला पाहिजे. त्यानंतर जेष्ठ नागरिकांचा विचार केला जाईल. यामध्ये 80,75, 70 वर्षापुढील जेष्ठांना लस दिली जाईल.

राज्य सरकारवर होत असलेल्या टीकेबाबत विचारले असता पवार म्हणाले, तीन पक्षांचे सरकार आहे. मंत्रीमंडळात वरिष्ठ, अनुभवी मंत्री आहेत. सरकार आमच्या पद्धतीने आम्ही व्यवस्थिपणे चालवत आहोत. अनेक प्रश्न येत आहेत. त्याला मजबुतीने सामोरे जावून मार्ग काढत आहोत. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.

पुणे महापालिकेत 23 गावे समाविष्ट केली आहेत. तशीच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतची काही गावे महापालिकेत समाविष्ट केली जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.