Pimpri News : …म्हणून पवना, इंद्रायणी नद्यांना नरेंद्र मोदी यांचे नाव द्या, राष्ट्रवादीची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून गेल्या चार वर्षात काहीही उपाय योजना झाल्या नाहीत. त्यामुळे या नद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिले तर नावासाठी का होईना, काहीतरी काम होईल. त्यासाठी या दोन्ही नद्यांना मोदी यांचे नाव द्यावे, अशी उपरोधिक मागणी राष्ट्रवादी पदवीधर सेलच्या पदाधिका-यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पवना, इंद्रायणीतील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होतात. तरीही या नद्यांना गटारगंगेचे स्वरूप आले आहे. सत्ताधा-यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे या नद्यांना नरेंद्र मोदी यांचे नाव दिले तर नावासाठी का होईना काहीतरी काम होईल. यंदा पर्यावरण अहवालावर सुद्धा चर्चा झाली नाही. तो फक्त कॉपी पेस्टचा माहिती अहवाल आहे असे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर कार्याध्यक्ष युनूस शेख , भोसरी विधानसभा अध्यक्ष अभिजित घोलप आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.