Pimpri News : सामाजिक कार्यकर्ते राहुल श्रीवास्तव यांचे कोरोनामुळे निधन

0

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते राहुल महादेव श्रीवास्तव (वय 48) यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते पिंपरी चिंचवड शहरात महिला 22 वर्षांपासून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. श्रीवास्तव यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांना सुरुवातीला महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

तिथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तीन दिवसांच्या उपचारानंतर काळेवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेही त्यांच्यावर तीन दिवस उपचार झाले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

श्रीवास्तव हे कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, पोलीस नागरिक संघटना आणि इसीए या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात 22 वर्षांपासून कार्य करत होते. त्यांचे तळवडे येथे वर्कशॉप होते. ते मूळचे परतवाडा, अमरावती येथील होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment