Pimpri News : शहरातील वीजसमस्या सोडवा; भाजप महिला मोर्चाची महावितरणकडे मागणी

याबाबत भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या पिंपरी कार्यालयातील कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांना निवेदन दिले.

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील वाढीव वीजबिले आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व अतिउच्चदाबामुळे नागरिकांच्या घरातील विदयुत उपकरणांचे होणारे नुकसान आदी समस्यांचे तातडीने  निराकरण करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या पिंपरी कार्यालयातील कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांना निवेदन दिले.

यावेळी उन्नति सोशल फाउंडेशन अध्यक्षा कुंदा संजय भिसे, भाजपच्या महिला पदाधिकारी सोनम मोरे, अ‍ॅड. मुग्धा खान्देशी उपस्थित होत्या.

गेल्या काही दिवसांपासून शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. शिवाय ग्राहकांना वाढीव वीजबिलांमुळे नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

अचानक वाढवणाऱ्या विजेच्या दाबामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होत आहे. या समस्या तातडीने दूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

दरम्यान, या निवेदनाची दखल घेत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणीचे लवकरच निरसन करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता वायफळकर यांनी शिष्टमंडळाला दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.