_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: शहरातील भाजपच्या काही नेत्यांना पुन्हा राष्ट्रवादीत यायचे आहे, लवकरच त्यांचे स्वागत करणार – अजित पवार

भाजपमधील कोणते नेते राष्ट्रवादीत जाणार?

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी परत राष्ट्रवादीत येण्याचे ठरविले आहे. त्यांचे स्वागत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील कोणते पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

भाजपमध्ये जाणा-यांना राष्ट्रवादीचे सरकार येणार नाही. भाजपचेच सरकार येईल, असे वाटत होते. त्यामुळे ते कामाकरता भाजपमध्ये गेले होते. जे कामा करता गेले असतील त्यांची तिथे कामे झाली नाहीत तर ते कामाकरता परत दुसरीकडे जातील.

_MPC_DIR_MPU_II

इतर पक्षातील आमदार घेताना भाजपला उकळ्या फुटत होत्या, बरे वाटत होते. आता गार-गार वाटते, असा टोलाही पवार यांनी भाजपला लगाविला.

आमदारांच्या पक्षप्रवेशाचा मुहुर्त ठरला आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले, मुहुर्त कधी ठरत नाही. आजपण मी पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांशी चर्चा करत बसलो होतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत येण्याचे ठरविले आहे. त्यांचे आम्ही स्वागत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.