Pimpri News : ‘ई पॉस मशीन’च्या अडचणीबाबत लवकरच तोडगा – रविंद्र चव्हाण

एमपीसी न्यूज – राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण (Pimpri News) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व सोलापूर विभागातील अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या युनिटवाईज आधार सिडींग कामकाजाचा गुरुवारी (दि. 1) रोजी मुंबईत आढावा घेण्यात आला. पुणे विभागाने ज्या पद्धतीने आधार सिडींगच्या कामकाजात मोठी आघाडी घेतली. त्याच धर्तीवर राज्यातील इतर विभागांनी देखील प्रशंसनीय कामकाज करावे. दुकानदारांना भेडसावणाऱ्या ‘ई पॉस मशीन’च्या अडचणीबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल. रास्त भाव दुकानदारांच्या आर्थिक उत्पन्नवाढीकरिता विविध उपाययोजना राबविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना मंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

पुणे विभागातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने आणि सुमित शिंदे तसेच रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष यांना राज्याचे पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि मंत्री चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे उपायुक्त (पुरवठा) डॉ. त्रिगुण कुलकर्णी, राज्याचे पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनचे पुणे जिल्हा व विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चिंतामणी सोंडकर उपस्थित होते.

आढावा बैठकीत ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनच्या (Pimpri News) पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री चव्हाण यांच्यासमोर तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरातील दुकानदारांच्या समस्यांचा उहापोह केला. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. 2021-22 सालाचे कमिशन आद्यपर्यंत मिळालेले नाही. बहुतांशी ठिकाणी जुलैपासून मशिन्स बंद आहेत. अहमदनगर जिल्हयातील जून आणि सांगली जिल्हयातील जून तसेच जुलै अशा दोन महिन्याचा डेटा अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही. सॉफ्टवेअर अपडेशन रखडले आहे. वयस्कर कार्डधारक ज्यांचे दोन युनिटचे कार्ड आहे; त्यांचे अंगठ्यांचे थंब करताना अडचणी उद्भवत आहेत. धान्य मशीनमध्ये वेळेवर अपलोड होत नाही.

Guru Tegh Bahadur Football Tournament: गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धा 9 डिसेंबरपासून सुरु

कार्डधारकांचे अंगठ्याचे ठसे लवकर उमटत नाहीत, त्यासाठी मशिनवर आधार सर्व्हरचे काम करणे गरजेचे आहे. धान्य वाटप करताना बहुतांशी वेळा सिस्टीमला सर्व्हर येतो, त्यामुळे कार्डधारकांच्या क्रोधास दुकानमालकाला सामोरे जावे लागते. पूर्वीच्या एकल पावतीप्रमाणेच ग्राहकांना धान्य वाटप व्हावे. त्यात बदल न होता केवळ एकदाच अंगठयाचा ठसा प्रविष्ट करावा, जेणेकरून ग्राहकांना विनाविलंब धान्य वाटप करता येईल. पूर्वी प्रमाणेच दोन्ही योजनांची एकत्रितपणे पावती देण्याची व्यवस्था करावी, अशा विविध समस्या मंत्र्यांच्या समोर उपस्थित केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.