Pimpri News : वाहन परवाना चाचणीसाठी शनिवार, रविवारी विशेष शिबिर

एमपीसी न्यूज – वाहन परवाना चाचणीसाठी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे शनिवार (दि.25) आणि रविवारी (दि.26) विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या अर्जदारांचा शिकाऊ परवाना सप्टेंबर 2021 अखेर पर्यंत संपत आहे, त्यांच्यासाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी 23 व 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. स्लॉट बुक केलेल्या अर्जदारांनी शनिवार (दि.25) आणि रविवारी (दि.26) वाहन परवाना चाचणीसाठी सकाळी 8 ते 10 या वेळेत हजर रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

अर्जदारांनी चाचणीकरीता येताना चेहऱ्यावर मास्क व हँण्ड ग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.