Pimpri News : हृदयरोग तपासणी शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज :  पिंपरी येथील श्री संदीप वाघेरे युवा मंच ( shri sandeep Waghere Yuva Manch)   व रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Ruby Lcare Services Pvt Ltd.)  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिरास ( heart check-up camp) आज ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती (Spontaneous response of senior citizens) नोंदविली.

पिंपरी गावातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरांमध्ये 148  नागरिकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

_MPC_DIR_MPU_II

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष म्हाळसाकांत जोशी ( Mhalsakant Joshi) तसेच नगरसेवक संदीप वाघेरे ( Corporator sandeep Waghere) यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास  सुधाकर यादव,  अशोक कुदळे, मधुकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुदळे, रंजना जाधव, राजेंद्र वाघेरे तसेच रुबी एलकेअर सर्व्हिसेसचे डॉ.नविद इस्लाम, मंजुषा लोहोटे, राजश्री हिरेमठ, रेश्मा गायकवाड, प्रविण राजाळे, अनुजा इंगळे, ज्योती कुर्‍हाडे, सुनिल तांबे, अर्चना गाजरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like