Pimpri News : सृजन प्रतिष्ठानचा शनिवारी ‘समाजदूत पुरस्कार’ सन्मान सोहळा

0

एमपीसी न्यूज – सृजन प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे समाजदूत पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, शल्यचिकित्सक डॉ. सुवर्णा दिवाण व डॉ. अभय दिवाण, अभिजित पाखरे, ज्ञानेश्वर शिरसाट यांची यावर्षीच्या समाजदूत पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजता काळभोरनगर येथे प्रतिभा महाविद्यालय सांस्कृतिक सभागृहात होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

सृजन प्रतिष्ठान आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यावर्षीचे पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, प्रतिभा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार ‘एमपीसी न्यूज’चे संपादक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक हे साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड तसेच दिलासा संस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉ. सुवर्णा दिवाण व डॉ. अभय दिवाण हे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक दाम्पत्य आहे. युवा प्रथम श्रेणी अधिकारी अभिजित पाखरे तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर तथा माउली शिरसाट यांची या वर्षीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.