Pimpri News : स्थायी समितीची 179 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे 179 कोटी 24 लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील दुध न देणा-या भाकड गायी, अपंग आणि आजारी असणा-या गायी तसेच जनावरांचा विशेषत्वाने सांभाळ करून त्यांना योग्य आहार पुरविण्यात येणार आहे. यासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आली. स्वतंत्र संस्थांना ही जबाबदारी देण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक 8 मध्ये ठिकठिकाणी फुटपाथ, दुभाजक आणि रस्ता सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी 7 कोटी 89 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 2 सेक्टर नं. 16 मध्ये राजे शिवाजीनगर मधील रस्ते अद्ययावत पध्दतीने करण्यासाठी 27 कोटी 94 लाख रुपये, महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे आवशक्यतेनुसार सुशोभिकरण करण्यासाठी 62 लाख रुपये खर्च होणार आहेत. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या जल:निसारण विभागाकडील कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र. 6 मधील धावडेवस्ती परिसरात आवश्यकतेनुसार 33 लाख रुपये खर्च होणार आहेत. ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आरोग्य विभागाकडील सार्वजनिक शौचालयाचे व मुता-यांची यांत्रिकी पध्दतीने देखभाल व किरकोळ स्वरूपाची दुरूस्ती करण्यासाठी 7 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

उद्यान विभागाकडील ब व ग क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. 22 व 23 मधील विविध उद्याने देखभाल व संरक्षण करण्यासाठी 54 लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिकेच्या रावेत ग्रॅव्हिटी व मामुर्डी पंपींगसाठी गुरूत्व वाहिनीचे देखभाल दुरूस्ती करण्यासाठी 17 लाख रुपये खर्च होणार आहे.

पाणीपुरवठा विभागाकडील विविध ठिकाणच्या पंप हाऊसचे चालन करण्यासाठी खर्च होणार आहे. यामध्ये थेरगाव गावठाण, सर्वे नं. 9 थेरगाव, लक्ष्मणनगर, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टर आणि पुनावळेसाठी 1 कोटी 36 लाख रुपये, सांगवी गावठाण, सांगवी पीडब्लूडी, सांगवी सर्वे नं. 84, पिंपळे गुरव दापोडीसाठी 1 कोटी 35 लाख रुपये, रहाटणी, सर्वे नं. 96, लांडेवाडी, दिघी, च-होली, आणि बोपखेलसाठी 1 कोटी 47 लाख रुपये आणि कृष्णानगर, सर्वे नं. 22 पाटीलनगर, जाधववाडी, सेक्टर 10 आणि गवळीमाथ्यासाठी 1 कोटी 56 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.