Pimpri news: वृक्षारोपणाने सेवा सप्ताहाची सुरुवात

प्रभाग क्रमांक 18 येथे वृक्षारोपण करून आज (सोमवारी) सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे भारतभर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात देखील विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. वृक्षारोपणाने सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 18 येथे वृक्षारोपण करून आज (सोमवारी) सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे उपस्थित होते.

त्याचबरोबर नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य विठ्ठल भोईर, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे व प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी प्रास्ताविक केले, प्रमुख अमित गोरखे यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम समन्वयक देवयानी भिंगारकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.