Pimpri News: फिट रहा ! शहरातील व्यायामशाळा उद्यापासून पुन्हा सुरु होणार

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या व्यायामशाळा (जीम) पुन्हा सुरु होणार आहेत. दस-याच्या मुहूर्तावर उद्यापासून अनलॉकमध्ये अटी-शर्तीसह पिंपरी-चिंचवड शहरातील व्यायामशाळा पुन्हा सुरु होणार आहेत.

65 वर्षांपेक्षा वयोगटातील व्यक्ती, दुर्धर आजार, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुलांना बंदिस्त व्यायामशाळांचा वापर करता येणार नाही. दरम्यान कंटेन्मेंट झोनमधील व्यायामशाळा बंद राहणार आहेत. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

हे आहेत नियम !

# सर्वांनी किमान सहा फूट शारीरिक अंतर राखावे

# व्यायामादरम्यान मास्कचा वापर बंधनकारक

# व्यायाम करताना एन-95 मास्कमुळे श्वास घेण्यास अडचण येवू शकते. त्यामुळे सर्जिकल किंवा मल्टीलेअर कापड, घट्ट विनलेल्या कापसाचे मास्क, नाक, तोंड, हनवटी या भागावर घट्टपणे बसतील, अशा मास्कचा वापर करावा

# व्यायाम करताना एकपदरी मास्क देखील वापरता येवू शकेल

# हात खराब झाले नसतील. तरी साबनाने वारंवार धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा

# खोकताना, शिंकताना रुमालचा वापर करावा

# आरोग्याचे स्वपरिक्षण करणे, आजाराची नोंद पालिकेच्या हेल्पलाईनला कळविणे

# परिसरात थुंकण्यास मनाई करावी

# आरोग्य सेतू ॲप वापरावा

# प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, हॅड सॅनिटायझर करणे बंधनकारक

# लक्षणे नसणा-या व्यक्तींना, कर्मचा-यांना परवानगी

# मास्क वापरणा-यांनाच प्रवेश द्यावा

# कोविडविषयी प्रतिबंधात्माक उपाययोजनांचे फलक लावावेत

# कोविडची जागृती करण्यासाठी ऑडिओ, व्हिडीओ क्लिपचा वापर करावा

# रांगेत किमान सहा फुट अंतर ठेवावे

# पार्किंग, कॉरिडॉर आणि लिफ्टमध्ये गर्दीचे व्यवस्थापन करावे

# व्यायामाची वेळ निश्चित करणे, आवार आणि उपकरणांचे निर्जंतुकीकरण करावे

# व्यायामशाळेत येणा-यांची आल्याची आणि जातानाच्या वेळेची नाव, मोबाईल नंबर पत्त्यांसह नोंद ठेवावी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.