Pimpri news: शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नसबंदी शस्त्रक्रीया करणाऱ्या संस्थांची चौकशी करा – मंगला कदम

भटकी कुत्री टोळीने वावरत असल्यामुळे रस्त्यावरुन जाणा-या पादचारी तसेच दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात जोगाजागी विशेषत: जिथे कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत, तिथे कुत्र्यांचा वावर जास्त आहे. भटकी कुत्री टोळीने वावरत असल्यामुळे रस्त्यावरुन जाणा-या पादचारी तसेच दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे भटक्या कुत्रांबाबत नागरीकांमध्ये दशहत पसरली आहे. याला कारणीभूत ठरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी आणि ज्या संस्थांना नसबंदी शस्त्रक्रीया करण्याचे काम दिले आहे. त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका कदम यांनी म्हटले आहे की,
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रीया करुन त्यांना त्यांच्या जुन्या अधिवासात सोडण्यात येते.

त्या अनुषंगाने पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून दोन खाजगी संस्था नेमून त्यांच्यामार्फत भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रीया केली जाते. कुत्रांना त्यांच्या जुन्या अधिवासात सोडले जाते.

_MPC_DIR_MPU_II

परंतु संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे या खाजगी संस्था नक्की काम करतात का ? याबाबत संशय निर्माण होत आहे. तसेच मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी हे कामात हलगर्जीपणा करीत आहेत.

त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे प्रसंगी अपघात होऊन नागरीक जखमी होतात. तसेच सकाळी मार्निंग वॉकला जाणारे जेष्ठ नागरीकांच्या अंगावर धावून त्यांना जखमी करतात.

पशुवैद्यकीय अधिकारी व ज्या संस्थांना हे काम दिले आहे, यांची सखोल चौकशी करण्यात यावी. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

तसेच या संस्था खोटी माहिती देत असल्यास अथवा दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1