Pimpri News: स्मार्ट सिटी इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट; नव तंत्रज्ञानाची घेतली माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागातून चांगल्या आर्थिक संधींसाठी होणारे स्थलांतर, शहरांच्या कार्यक्षमतेत अधिक लवचिकता प्रदान करण्यासाठी तसेच शहरांमधील वाहतुक, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा, गतिशीलता, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सुरक्षा, पाण्याचे सुनियोजन होण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत निगडी येथे उभारण्यात आलेल्या इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला (ICCC) पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, जेएसपीएम राजश्री शाहू अभियांत्रिकी या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भेट देवून नवतंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने 1 ते 3 ऑक्टोबर या कालावधीत “आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या, डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, जेएसपीएम राजश्री शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या 140 विद्यार्थ्यांनी या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची उभारणी, कामकाजाच्या कार्यपदधती यांसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शीतल कुमार उपस्थित होते.

शहरी पायाभूत सुविधांच्या विकासामुळे कचरा व्यवस्थापन, ऊर्जा, गतिशीलता, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सुरक्षा ही आव्हाने उभी राहीली आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच त्यातील संधी ओळखून केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशनची सुरुवात केली आहे. शहरांची वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर याचा विचार करून शहरांच्या कार्यक्षमता अधिक प्रभावी करण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे. पायाभुत सुविधांकरीता तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक असून एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून पारंपारिक पद्धतींपेक्षा प्रत्यक्ष स्थ‍ितीचा निर्णय / धोरणे तयार करण्याची प्रशासनाची गरज सक्षम करून ऑपरेशन व्यवस्थापन, दैनंदिन अपवाद हाताळणी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मुख्य केंद्र म्हणून काम करते.

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये उभारलेल्या सिस्टीममधून सेन्सरमध्ये माहिती गोळा करून त्यानंतर संबंधित विभागांना योग्य व्हिज्युअलायझेशनसह कृतीयोग्य माहिती प्रदान केली जाणार आहे, यामधून प्रशासनाचे कामकाज अधि‍क होणार आहे, अशी माहिती सह मुख्य कार्यकारी अध‍िकारी निळकंठ पोमण यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.