Pimpri News: नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या मातोश्री सुमन वाघेरे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरीगावातील सुमन बाळकृष्ण वाघेरे यांचे आज (मंगळवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 72 होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या त्या आई होत. 

सुमन  वाघेरे यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती बाळकृष्ण वाघेरे, तीन मुले प्रदीप वाघेरे, माणिक वाघेरे, संदीप वाघेरे आणि एक मुलगी संगीता वाघेरे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सुमन वाघेरे यांच्या पार्थिवावर आज रात्री दहा वाजता पिंपरीगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.