Pimpri News: ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत 22 लाख 60 हजार नागरिकांचे सर्वेक्षण, 562 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहीमेसाठी 1314 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत एकूण 22 लाख 60 हजार 946 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 2342 कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील 562 व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

कोविड 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्‍याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. शहरात 18 सप्टेंबरपासून ही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत गृहभेटी देऊन नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. कोरोना नियंत्रण आणण्यासाठी घरोघरी भेटी देऊन आरोग्य तपासणी व जनजागृती केली जात आहे.

संशयित कोरोना रुग्ण शोधणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार असलेल्या व्यक्तींना शोधण्याचे काम मोहिमेत केले जाते. याशिवाय बालकांचे लसीकरण करणे, गरोदर मातांवर वेळीच उपचार या बाबींचाही समावेश आहे. ही मोहीम पहिल्या फेरीत 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर आणि दुसऱ्या फेरीमध्ये 14 ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत होणार आहे.

या मोहीमेसाठी 1314 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहेत. त्यांचेमार्फत सर्व्हेक्षण केले जाते. कालपर्यंत एकूण 22 लाख 60 हजार 946 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 2342 कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील 562 व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.