Pimpri News: महापालिका सहायक आयुक्तपदी सुषमा शिंदे रुजू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त पदावर मुख्याधिकारी गट ‘अ’ संवर्गातील सुषमा शिंदे या रूजू झाल्या आहेत. शिंदे यांच्याकडे ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्याच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील वडगांव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी असलेल्या सुषमा शिंदे यांना 18 जानेवारी 2021 रोजी पिंपरी – चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त पदावर बढती दिली. त्याचदिवशी म्हणजे 18 जानेवारी रोजी शिंदे यांना नगरपरिषदेतून कार्यमुक्त करण्यात आले.

त्यानुसार सुषमा शिंदे यांनी मंगळवारी (दि. 19) पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सहायक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. शिंदे यांच्याकडे महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपविण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.