Pimpri News: ‘सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत उचित कार्यवाही करा’

विभागीय कार्यालयातील उपायुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेत महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदींचा भंग केल्याच्या तक्रारीवर कार्यवाही करावी. त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार महापालिकेशी संबंधित आहे. या तक्रार अर्जावर उचित कार्यवाही करावी, अशी सूचना पुणे विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. प्रदिप ठेंगल यांनी महापालिकेला केला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील त्यांनी यांना पत्र पाठविले. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांनी महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आरोप करत त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केली होती.

_MPC_DIR_MPU_II

नगरसेविका शिलवंत – धर यांचे पती, दोन भाऊ संचालक असलेल्या ॲडीसन लाईफ सायन्स कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना कालावधीत 10 लाखांचे मास्क पुरविले. यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ननावरे यांनी केला होता.

नगरसेविका शिलवंत-धर यांनी महापालिका कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करावे, अशी मागणी ननावरे यांनी विभागीय आयुक्तांकडे 10 मार्च रोजी केली होती.

त्यावर ननावरे यांनी केलेली तक्रार महापालिकेशी संबंधित आहे. या तक्रार अर्जावर महापालिका स्तरावरुन उचित कार्यवाही करुन अर्जदार यांना लेखी कळविण्याची सूचना पुणे विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त डॉ. प्रदिप ठेंगल यांनी महापालिकेला केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.