Pimpri news: लोकप्रतिनिधींच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करा; विलंब केल्यास कारवाई

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा विभागप्रमुखांना इशारा

एमपीसी न्यूज – मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या तक्रारी आणि निवेदने पिंपरी-चिंचवड पालिकेकडे येत असतात. त्यावर वेळेत कारवाई करून लोकप्रतिनीधींना अवगत करणे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. मात्र, निवेदने, तक्रारींवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब गंभीर असून कार्यालयीन सुसूत्रेस धरून नाही. यामुळे जनमानसातील पालिकेच्या विश्वासास तडा जात आहे. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींवर तत्काळ यथोचित कारवाई करावी. केलेल्या कारवाईचा अहवाल त्यांना अवगत करावा. विलंब केल्यास विभागप्रमुखांवर कारवाईचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. याबाबतचे अत्यंत महत्वाचे परिपत्रक आयुक्तांनी विभागप्रमुखांना पाठविले आहे.

शहरातील विकास कामे, विविध बाबींबाबत मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या तक्रारी पिंपरी-चिंचवड पालिकेकडे येत असतात. त्यावर कारवाई करणे अभिप्रेत आहे. केलेल्या कारवाईची माहिती पालिकेच्या वेबसाईटवरील कर्मचाऱ्यांसाठी इ-फाईल नोंद, आवक टपाल रजिस्टरमध्ये अद्यावत करण्यात यावी.

परंतु, निवेदने, तक्रारींवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब गंभीर असून कार्यालयीन सुसूत्रेस धरून नाही. यामुळे जनमानसातील पालिकेच्या विश्वासास तडा जात आहे. लोकप्रतिनीधींच्या तक्रारींवर तत्काळ यथोचित कारवाई करावी.

कारवाईबाबत लोकप्रतिनीधींना लागलीच अवगत करून तक्रारी निकालात काढण्यात याव्यात. त्याप्रमाणे नोंदी ताबडतोब संगणकीय रजिस्टरमध्ये घेण्यात याव्यात.

लोकप्रतिनीधींच्या पत्रावर प्राधान्याने कारवाई न केल्यास अथवा त्यांना अवगत करण्यात न आल्याची बाब निदर्शनास आल्यास. त्याचप्रमाणे संगणकीय आवक रजिस्टरमध्ये शेरा कॉलममध्ये केलेल्या कारवाईचा तपशील नमूद करावा. तसे न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागप्रमुख, शाखाप्रमुखांची राहील. त्यांच्या विरुद्ध नाइलाजास्तव नियमाधीन कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.