_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: कोरोनाबाधितांकडून अधिक पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करा – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांची लूट केली आहे. वसूल केलेले जादा पैसे संबंधित रुग्णांना सक्तीने परत करण्यास रुग्णालयांना भाग पाडावे. संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

कोरोना आजारावर उपचार केल्यानंतर अव्वाच्या सव्वा बिल वसूल केलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी कोविड रुग्णालयांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर देखील संबंधित रुग्णांना जादाची बिले परत केलेली नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

धक्कादायक बाब म्हणजे याबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून प्रसारमाध्यमांना दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. त्यातून महापालिकेकडून एक प्रकारे या प्रकरणांवर पांघरून घालण्याचेच पाप केले जात आहे. त्यामुळे आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना खरमरीत पत्र लिहून त्यांचे कान उपटले आहेत.

लूट झालेल्या रुग्णांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी संबंधित खासगी कोविड रुग्णालयांना भाग पाडा. त्यांच्यावर राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार आणि आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यास त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे.

सर्व रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांचे पुन्हा ऑडिट करण्यात यावे, असेही आमदार जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.