Talegaon News : तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्ष-कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्ष-कामगार आघाडीची कार्यकारिणी शहर अध्यक्ष अशोक दादाभाऊ दाभाडे यांनी जाहीर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे होते.

यावेळी जिल्हा भाजपॉ अध्यक्ष गणेश भेगडे, माजी नगराध्यक्ष ॲड. रविंद्रनाथ दाभाडे, शहराध्यक्ष रविंद्र माने, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, तालुका कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे आदींनी मार्गदर्शन केले.

या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष इंदर ओसवाल, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, गटनेते अरुण भेगडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे, संध्या भेगडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष गणेश उंडे, भाजयुमो अध्यक्ष अक्षय भेगडे, कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे यांच्यासह पदाधिकारी, कामगार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे शहर नवनिर्वाचित कार्यकारिणी – कार्याध्यक्ष- स्वप्नील किसन भेगडे,  सरचिटणीस – आनंद पूर्णपात्रे,  अजिंक्य दाभाडे, सुयोग शिरसाठ, योगेश पाटील, उपाध्यक्ष – बबन कडुसकर, अनिल शेलार, सतिष पारगे, तुकाराम आखाडे, प्रसिद्धीप्रमुख – नामदेव मदने, कार्यकारिणी सदस्य – संकेत ओसवाल, भास्कर रेड्डी, कृष्णात चौघुले, ज्ञानेश्वर गुंड, विजय चौघुले, सुनिल धोटे अशी आहे.

या वेळी लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून  त्यांच्या कार्याचा गौरव मनोगताव्दारे मान्यारांनी वक्त केला. स्वागत रजनी ठाकूर, प्रास्तविक अशोक दाभाडे, सूत्रसंचालन रविंद्र साबळे, विनायक भेगडे, आभार आनंद पूर्णपात्रे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.