Pimpri News: म्युनिसीपल ई- क्लासरूम प्रकल्पांतर्गंत शिक्षकांनी घेतले तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri News) व स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या ई-क्लास रूम प्रकल्पांतर्गत 100 महापालिका शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देण्यात आले. शाळांच्या मागणीनुसार 12 वर्गाद्वारे 350 शिक्षकांनी डिजिटल कॉन्टेंट, कम्पुटर लॅब ऑपरेटींग, स्टीम लॅब (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) तसेच रोबोटीक लॅब आणि कॅमेरे सुरु करण्याबाबतचे प्रशिक्षण घेतले.

शिक्षकांच्या शंकांचे निराकरण प्रशिक्षण कार्यक्रमावेळी करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत म्युनिसीपल ई-क्लासरूम प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 123 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी 2 टप्प्यात करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात 11 शाळांमध्ये प्राथमिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती. तसेच प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे कामकाज 112 शाळांमध्ये पूर्ण झाले आहे.

प्रकल्पामध्ये संगणक कक्ष, डिजीटल ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, वायफाय एक्सेस पॉईंट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरा, व्हीडीओ रेकॉर्डींग, शैक्षणिक विश्लेषण सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब (विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित), गणित, इंग्रजी आणि विज्ञानासाठी तज्ञ शिक्षकांची नियुक्ती, प्रकल्प व्यवस्थापन आणि हेल्प डेस्क सेवा, ऑनलाइन डॅशबोर्ड आदी बहुतांश घटकांचा समावेश आहे.

Bhosari News: दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी घेतली ऐतिहासिक लेण्यांची माहिती

या प्रकल्पांतर्गत 1000 वर्ग खोल्यांमध्ये एलईडी डिस्प्ले, कम्पुटर, कॅमेरे बसविण्यात (Pimpri News) आलेले असून महापालिका शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. म्युनिसीपल ई-क्लासरूम प्रकल्पाचा सुमारे 44 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. मे. इडिक आणि केपीएमजी सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन देण्यात येत आहे. यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू शाळांचा समावेश असून मुख्याध्यापक कक्षातून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि समस्या निराकरणास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.