Pimpri news: तीन दिवसांनंतरही मृतदेह ताब्यात मिळेना; नातेवाईकांचा संताप

नगरसेवक संदीप वाघेरे वायसीएममध्ये दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू आहे. मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांपासून मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नगरसेवक संदीप वाघेरे तिथे दाखल झाले आहेत.

पिंपरी डेअरी फार्म येथील कर्मचारी किशोर कावळे यांचा 2 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. छातीवर दाब आल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच कोरोनाचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. तरी देखील मृतदेह ताब्यात दिली जात नाही. डेडहाऊस मध्ये मृतदेह ठेवला आहे.

कोल्ड रूम महिन्याभरापासून बंद आहे. तीन दिवसांपासून मृतदेह ताब्यात दिला जात नाही. सातत्याने नियम बदलले जात आहेत. कोविडची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरी देखील मृतदेह ताब्यात देण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, महिन्याभरापासून डेडहाऊस मधील कोल्ड रूम बंद आहे. किशोर कावळे यांचा 2 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. आज तीन दिवस झाले. तरी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात  दिला जात नाही. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. आयुक्त फोन उचलत नाहीत. कोणाच्या कोणाला ताळमेळ नाही. याचा नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भोंगळ कारभार सुरू आहे. आयुक्तांचे वायसीएमकडे लक्ष नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.