Pimpri news: शहरात गुरुवारी सायंकाळी पाणी नाही; तर शुक्रवारी विस्कळीत

एमपीसी न्यूज – रावेत येथील जलउपसा केंद्रातील नियमित देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.26) शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर शहरातील सर्व भागाचा दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पालिका रावेत बंधा-यातून पाणी उचलते. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहराला पाणीपुरवठा केला जातो.

रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून येणाऱ्या उच्च दाबाच्या पंपिंग मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबविणे. विद्युत विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची कामे करणे, निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा व पाणीपुरवठा विषयक कामे आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे.

या कामासाठी गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागाचा दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.