Pimpri News: पिंपरी-चिंचवड शहराची 100 टक्के कोविड लसीकरणाकडे वाटचाल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आजअखेर 17 लाख 93 हजार 894 नागरिकांनी डोसची पहिली मात्रा घेतली. तर, 15 लाख 28 हजार 482 नागरिकांनी डोसची दुसरी मात्रा घेतली. त्याचप्रमाणे 38 हजार 698  नागरिकांनी बुस्टर डोस घेतला असे एकूण 33 लाख 61 हजार 74 नागरिकांनी लसीकरणाची मात्रा घेतलेली आहे. तसेच 15 ते 18  वयोगटातील 77 हजार 809 मुलामुलींनी डोसची मात्रा घेतलेली आहे. त्यामुळे शहराची 100 टक्के कोरोना प्रतिबंधक  लसीकरणाकडे वाटचाल सुरु असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

याबाबतची माहिती देताना ते म्हणाले की, शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोविड 19 लसीकरण झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होवुन सुध्दा रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होवुनही रुग्णांना रुग्णालयीन उपचार घेण्याची सुध्दा गरज पडत नाही. यावरुन लसीकरण हाच यावर रामबाण उपाय असून लसीकरण हेच कोविड-१९ चा प्रादुर्भाव न होण्यासाठी कवच असल्याचे वर नमुद केलेल्या आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे.

त्यामुळे शहराचे 100 टक्के कोविड-19 प्रतिबंधाच्या लसीकरणाचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी ज्या नागरिकांनी अद्याप कोविड लसीकरण करुन घेतलेले नाही अशा नागरिकांना स्वयंस्फूर्तीने आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.