Pimpri News: शहराला ‘ओडीएफ’मध्ये प्लस प्लस मानांकन

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हगणदारी मुक्त (Open Defecation Free) पिंपरी-चिंचवड शहराला ‘ओडीएफ’मध्ये प्लस प्लस मानांकन देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हगणदारी मुक्त  असलेल्या शहरांना मानांकन देण्यात येते. त्याकरिता केंद्र शासनामार्फत पाठविण्यात आलेल्या पथकामार्फत  14 ते 12 डिसेंबर 2020 या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाहणी करण्यात आलेली होती.

या पाहणीमध्ये पथकामार्फत शहरातील मैला शुध्दीकरण केंद्र, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये आणि   सार्वजनिक मुता-यांची तपासणी करण्यात आली. पथकमार्फत झालेल्या पाहणीनुसार केंद्र शासनामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या मानांकन यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरास  ‘ओडीएफ’मध्ये प्लस प्लस  हे मानांकन देण्यात आलेले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगिण विकासाकरिता आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेले यश आहे.

सर्व नागरिकांनी दिलेल्या योगदानामुळे व स्वच्छ भारत अभियानामध्ये नोंदविलेल्या महभागामुळे महापालिकेस  ‘ओडीएफ’मध्ये प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.