Pimpri corona Update : शहरात आज 1189 नवीन रुग्णांची नोंद, 16 मृत्यू

ब' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 186 आणि 'ड' कार्यालय हद्दीत 183 नवीन रुग्ण सापडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढायला लागले आहे. 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, शहराच्या विविध भागातील 1187 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 1189 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली.

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 186 आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत 183 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 846 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 11 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 16 जणांचा आज मृत्यू झाला आहे.

त्यात चिंचवड येथील 87 वर्षीय पुरुष, चिखलीतील 75 वर्षीय पुरुष, दिघीतील 45 वर्षीय पुरुष, विकासनगर देहूरोड येथील 72 वर्षीय पुरुष, मोशीतील 72 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 58 वर्षीय पुरुष, पिंपळेनिलख मधील 67 वर्षीय पुरुष, भोसरीतील 89 वर्षीय महिला, चिंचवड येथील 75 वर्षीय महिला, नेहरुनगर येथील 70 वर्षीय महिला, भोसरीतील 64 वर्षीय महिला, जुन्नर येथील 74 वर्षीय पुरुष, आंबेगावातील 85 वर्षीय पुरुष, चाकण येथील 65 वर्षीय पुरुष, देहूरोड येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

मागील चोवीस तासात दोन मृत्यू झाले असून आधी मृत झालेल्या केसेस असल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 23 हजार 552 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 10 हजार 404 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1923 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 807 अशा 2730 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1883 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2110 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 96 हजार 149 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3710 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.