Pimpri News: शहरात आज 1269 नवीन रुग्णांची नोंद, 676 जणांना डिस्चार्ज, 24 मृत्यू

शहरातील 17 आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 24 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1259 आणि हद्दीबाहेरील 10 अशा 1269 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 56 हजार 493 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 676 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 17 आणि पालिका हद्दीबाहेरील 7 अशा 24 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये भोसरी, संभाजीनगर, निगडी, दिघी, पिंपलेनिळख, आकुर्डी, थेरगाव, संत तुकारामनगर, शाहूनगर, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, चिंचवड, देहूगाव, सांगवी, इंद्रायणीनगर, मावळ, देहूरोड, शिरूर, खेड येथील रुग्णांचा मृत्यू  झाला.

शहरात आजपर्यंत 56 हजार  483 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 44 हजार 618 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 943 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 228 अशा 1171 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5993 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.