Pimpri corona update : शहरात आज 1331 नवीन रुग्णांची नोंद, 1272 जणांना डिस्चार्ज, 41 मृत्यू

शहरात आजपर्यंत 61 हजार 231 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 46 हजार 953 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. शहराच्या विविध भागातील 1265 आणि महापालिका हद्दीबाहेरील 66 अशा 1331 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 61 हजार 231 वर पोहोचली आहे. शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1272 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 28 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 13 अशा 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 21 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर, 1 सप्टेंबर पासून झालेल्या 20 मृत्यूची नोंद आज झाली आहे.

भोसरी, वाकड, थेरगाव, संत तुकारामनगर, मोशी, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, दापोडी, दिघी, वाल्हेकरवाडी, पिंपलेनिळख, पिंपळेगुरव, यमुनानगर, येरवडा, कसबा पेठ, शिवणे, हडपसर, चंदननगर, जुन्नर, लोणावळा आणि सातारा येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 61 हजार 231 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 46 हजार 953 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1008 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 257 अशा 1265 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6486 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.