Pimpri Corona Update : शहरात आज 2492 नवीन रुग्णांची नोंद; 71 मृत्यू

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 417 आणि महापालिका हद्दीबाहेरील 75 अशा 2 हजार 492  नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी)  नोंद झाली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात हद्दीत सर्वाधिक 445 रुग्ण सापडले आहेत. तर, 71 जणांचा मृत्यू झाला. 

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1833 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 43 आणि महापालिका हद्दीबाहेरील 28 अशा 71 जणांचा आज मृत्यू झाला.

त्यात 52 पुरुष आणि 19 महिला रुग्णांचा समावेश आहे.  मागील चोवीस तासात 8 मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

शहरात आजपर्यंत 1 लाख 95 हजार 929 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 69 हजार 235 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2551 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 1141 अशा 3692 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 8 हजार 384 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 7 हजार 619 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 3 लाख 43 हजार 191 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.