Pimpri News: शहरात आज 256 नवीन रुग्णांची नोंद, 292 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 253 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 256 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 54 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 292 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका हद्दीतील 8 आणि हद्दीबाहेरील 3 अशा 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये पिंपरीतील 70 वर्षीय पुरुष , काळेवाडीतील 64 वर्षीय पुरुष , पिंपळेनिलख येथील 61, 62 वर्षीय दोन पुरुष, भोसरीतील 87 वर्षीय पुरुष, निगडीतील 89 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 71 वर्षीय महिला, जुन्नर येथील 52 वर्षीय पुरुष, आळंदीतील 50 वर्षीय पुरुष आणि कात्रज येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 1 लाख 5957 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 684 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1850 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 775 अशा 2625 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1141 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 322 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 23 हजार 371 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.