Pimpri News: शहरात आज 602 नवीन रुग्णांची नोंद, 255 कोरोनामुक्त, चार मृत्यू

ड' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 104 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 602 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 104 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 255 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील एक आणि महापालिका हद्दीबाहेरील तीन अशा चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात रावेत येथील 80 वर्षीय पुरुष, वडगावशेरीतील 67 वर्षीय पुरुष, खडकीतील 63 वर्षीय पुरुष, जळगाव येथील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 7832 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 1714 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1855 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 779 अशा 2634 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1241 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 756 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.