Pimpri News: शहरात आज 106 नवीन रुग्णांची नोंद, 167 जणांना डिस्चार्ज, 4 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 106 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 167 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यामध्ये चिखलीतील 71 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 47 वर्षीय पुरुष, खेड येथील 98 वर्षीय वृद्ध, उरुळी कांचन येथील 67 महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 832 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 97 हजार 44 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1821 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 766 अशा 2587 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 588 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 320 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 8753 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 672 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.