Pimpri corona Update : शहरात आज 141 नवीन रुग्णांची नोंद, 71 जणांना डिस्चार्ज; 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 140 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 141 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 97 हजार 175 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 71 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील दोन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन जणांचा आज मृत्यू झाला. त्यात पिंपरीतील 73 वर्षीय महिला, रहाटणीतील 58 वर्षीय महिला आणि जुन्नर येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 97 हजार 175 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 93 हजार 738 जण बरे होऊन घरी गेले. शहरातील 1764 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 735 अशा 2499 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 693 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2327 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान, इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी सात प्रवाशांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले असता दोन अहवाल नकारात्मक व पाच अहवाल प्रलंबित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.