Pimpri corona Update : शहरात आज 171 नवीन रुग्णांची नोंद, 136 जणांना डिस्चार्ज, 2 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 171 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 94 हजार 948 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात थेरगाव येथील 52 वर्षीय पुरुष आणि चिंचवड येथील 51 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 94 हजार 948 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 91 हजार 609 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1726 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 710 अशा 2436 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 714 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1359 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.