Pimpri Corona Update : शहरात आज 245 नवीन रुग्णांची नोंद, 233 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 245 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 5 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 10 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 270 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 56 हजार 219 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 145 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 342 रुग्ण गृहविलगीकरणात असून 803 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 35 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 405 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 528 जणांचे लसीकरण झाले. तर, आजपर्यंत 5 लाख 79 हजार 745 जणांनी लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.