Pimpri corona Update : शहरात आज 282 नवीन रुग्णांची नोंद, 49 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 282 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 286 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 57 हजार 788 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 368 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 368 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 44 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 437 आहेत. आजपर्यंत 6 लाख 51 हजार 810 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.