Pimpri news: शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी विस्कळीत

गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवार (दि.3) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील  जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे.

तसेच  शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार (दि.3) रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

गुरुवारी पालिकेमार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि.4) होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसासाठा करून काटकसरीने वापर करुन सहकार्य करण्याचे अवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.