Pimpri news: स्वच्छतेसह कोविड संबंधी कामकाज केलेल्या संस्था, कंपन्या, उद्योजकांचा पालिका गौरव करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता तसेच कोविड 19 संबंधी कामकाज केलेल्या संस्था, कंपन्या, उद्योजकांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी उल्लेखनीय काम केलेल्यांनी नावे पाठविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

स्वच्छ महाराष्ट्र/ भारतअभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी -चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेले आहे. या अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु आहे.

त्या अनुषंगाने नवीन कंपनी, उद्योजक, औदयोगिक /धार्मिक / स्वयंसेवी संस्था यांनी एप्रिल 2020 पासुन घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी, कोविड 19 इत्यादी स्वच्छता विषयक बाबींबाबत महत्वपुर्ण कामकाज केले आहे. किंवा याबाबत वेगळे उत्पादन किंवा सेवा विकसित केली आहे, त्यांना गौरविण्यात येणार आहे.

संबंधितांनी आपली नावे, पत्ता, संपर्क क्रमांक, कामकाज करतानाचे फोटो तसेच कामकाजाकरीता थोडक्यात माहिती पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या [email protected] या ईमेल आयडीवर 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत पाठविण्यात यावी.

शहरातील जास्तीत जास्त नवीन कंपनी, उदयोजक, औदयोगिक /धार्मिक / स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग नोंदवुन पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.