Pimpri News: शहरातील ‘या’ 33 केंद्रावर सोमवारी ‘कोविशिल्ड’चा पहिला आणि दुसरा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस 33 केंद्रावर देण्यात येणार आहे. एका केंद्रावर 100 जणांना लस दिली जाणार आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान (84 ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.

या केंद्रांवर मिळणार लस!
नवीन आकुर्डी रुग्णालय, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, रोटरी क्लब सेंटर, साई आंब्रेला संभाजीनगर, महापालिका शाळा जाधववाडी, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, प्राथमिक शाळा 92 म्हेत्रेवस्ती, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, नेहरूनगर उर्दू शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, क्वालिटी सर्कल भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, मोशी दवाखाना, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा चऱ्होली, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, कासारवाडी दवाखाना, खिंवसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख महापालिका शाळा, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग,महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, तालेरा रुग्णालय चिंचवड, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.