Pimpri News: विरोधक सभागृहात येण्यापूर्वीच महासभा तहकूब; विरोधकांचे आंदोलन फसले

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा कोणतेही सबळ कारण न देता सत्ताधारी भाजपने आज पुन्हा तहकूब केली. विरोधक सभागृहात येण्याअगोदरच महासभा तहकूब करत भाजपने विरोधकांच्या आंदोलनातील हवाच काढून घेतली. दरम्यान, विरोधकही उशीरा सभागृहात आले. सभा तहकूब झाल्यानंतर भाजपचा निषेध करणारे ‘ॲप्रेन’ परिधान करत राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात आले होते. यातून विरोधकांची स्टंटबाजी उघड झाली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित करण्यात आली होती; मात्र कोणतेही सबळ कारण न देता ही सभा पुढे ढकलण्यात आली. 9 मार्च 2021 पर्यंत महासभा तहकूब केल्याचे महापौर उषा ढोरे यांनी जाहीर केले.

गुरुवारच्या सभेत स्थायी समितीवर अपक्ष आघाडीतून सदस्य नियुक्त करायच्या प्रक्रियेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला. त्यातच नियुक्तीस मंजुरी देऊन महापौरांनी सभा सोमवारपर्यंत तहकूब केली होती.

आजच्या सभेत आंदोलन करण्याचा पावित्रा विरोधकांनी घेतला होता; मात्र विरोधक सभागृहात येण्यापूर्वीच सभा तहकूब करून भाजपने विरोधकांच्या आंदोलनाची हवाच काढून टाकली.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारची तहकूब सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी दोन वाजता सुरू झाली. भाजपचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. सभेची निर्धारित वेळ झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहाबाहेर होते. सभेला बोटावर मोजण्याइतके सभासद सभागृहात हजर होते.

याचा फायदा घेत सभेला तातडीने सुरुवात करून सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सभेच्या सुरुवातीलाच सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला भाजपचे विकास डोळस यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर आजची सभा 9 मार्चपर्यंत तहकूब केल्याचे महापौरांनी जाहीर केले.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवक आंदोलन करण्याच्या तयारीसाठी विरोधी पक्ष नेत्यांच्या कक्षात होते. ‘भाजप हटाव, महापालिका बचाव’ असे ॲप्रन घालून ते महापालिका सभागृहाकडे निघाले. ते सभागृहात पोहोचण्यापूर्वीच महापौरांनी सभा तहकूब झाल्याचे जाहीर केले आणि राष्ट्रगीत सुरू झाले. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचा आंदोलनाचा डाव फसला.

सर्वसाधारण सभेत शहराचे प्रश्न, समस्या आणि गरजा सदस्य मांडत असतात. मात्र सत्ताधारी त्यांचे अंतर्गत राजकारण आणि त्यांच्या सोयीनुसार महापालिका सभेकडे पाहत आहे. गुरुवारी सदस्यांनी गोंधळ घातला म्हणून सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठीच आजची सभा तहकूब केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ”स्थायी समितीची विशेष सभा अडीच वाजता होती. तर महापौर उषा ढोरे यांचे काही खासगी कार्यक्रम आहेत. त्यामुळे 9 मार्चपर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.